⚜️पोपट⚜️
हिरवा हिरवा पोपट तो,
सांग तुला का आवडतो
चोच तयाची लाल कशी,
पिकलेली मिरचीच जशी
बारीक डोळे वाटोळे,
कान तयाचे लपलेले
गळ्यात पट्टा बघ काळा,
पंख हलवून करी चाळा
फडफड करितो पंखाची,
वेळ जाहली खाण्याची
डाळ पेरू अन डाळिंब,
काय देऊ तुला तरी सांग
पिऊन पाणी गोड बोलुनी,
भजन करील बघ हा जेव्हा
वाजिव टाळ्या तू तेव्हा