⚜️जत्रा⚜️

⚜️जत्रा⚜️

एकदा रानात जत्रा जमली
अस्वल बनले दुकानदार 
खेळणी मांडली शानदार
झाडावरून खार आली 
दुकान पाहून धुंद झाली
तिने घेतल्या लेमन गोळ्या 
दहा पैशाच्या मिळाल्या सोळा
सर्कशी मधून वाघोबा आले 
अस्वल दुकान टाकून पळाले.