⚜️उतारा वाचन भाग ७७⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ७७⚜️

     पेरू हे फळ आहे. पेरू चवीला गोड आणि रंगाने हलका हिरवा असतो. त्याच्या लगदयामध्ये शेकडो लहान बिया असतात. पेरू भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध आहे. त्याचे झाडही अनेकजण घरात लावतात. पेरू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरूमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजेच रोगांशी लढण्यास मदत होते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) पेरू चवीला कसा असतो ?
२) पेरूचा रंग कोणता असतो ?
३) पेरूत लहान बिया कुठे असतात ?
४) पेरु सहज कोठे उपलब्ध होतो ?
५) बहुतेक जण पेरुचे झाड कोठे लावतात?
६) पेरू कशासाठी फायदेशीर आहे ?
७) कोणत्या फळात अनेक प्रकारची खनिजे व जीवनसत्त्वे असतात ?
८) पेरुमूळे काय वाढते ? 
९) रोगांशी लढण्यास कोणत्या फळामुळे मदत होते ?
१०) वरील उताऱ्यात कोणत्या फळाचा उल्लेख आला आहे ?
११) 'पेरु हे फळ आहे' या वाक्यातील नाम ओळख.
१२) 'फायदेशीर' या शब्दातील शरीराच्या अवयवाचे नाव शोध.
१३) तुला आवडणाऱ्या फळांची नावे लिही.
१४) 'पेरु' या फळाचे चित्र काढून रंगव.
१५) पेरूच्या झाडाचे तुला माहित असणारे फायदे लिही.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421