⚜️उतारा वाचन भाग ८०⚜️
ठेंगू चंदूनं खिडकीवर टकटक केलं. बंडूनं कूस बदलली. चंदूनं पुन्हा टकटक केलं.बंडू पूर्ण जागा झाला. ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला, की त्याला बोलायला सुचेना. मग उडी मारुन तो खिडकीपाशी आला.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) खिडकीवर कोणी टकटक केले ?
२) कूस कोणी बदलली ?
३) पूर्ण जागा कोण झाला ?
४) कोणाला पाहून बंडू थक्क झाला ?
५) उडी मारुन खिडकीपाशी कोण आला ?
६) बंडूला का बोलायचे सुचेना ?
७) ठेंगू चंदूंन कोठे टकटक केले ?
८) ' थक्क होणे ' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
९) 'टकटक' शब्दसारखे अजून काही शब्द तुमच्या मनाने लिहा.
१०)......... ने पुन्हा टकटक केलं. (रिकाम्या जागी उताऱ्यातील योग्य शब्द लिहा.)
११) 'मग उडी मारून तो खिडकीपाशी आला.' या वाक्यात तो हे सर्वनाम कोणासाठी वापरले आहे?
१२) जसे खिड़की - खिडकीपाशी
तसे घर विहीर -
१३) उताऱ्यात किती प्रकारची विरामचिन्हे वापरण्यात आली आहे ?
१४) वरील उताऱ्यात दोन अक्षरी किती शब्द आले आहेत व कोणते ते लिहा.
१५) वरील उताऱ्यात असलेले जोडाक्षरे लिहा.