⚜️राजीनामा की स्वेच्छा सेवानिवृत्ती ....⚜️

⚜️राजीनामा की स्वेच्छा सेवानिवृत्ती ....⚜️

     शासकीय अगर निमशासकीय कार्यालयात कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास कोणत्याही कारणास्तव शासकीय नोकरी करण्याची इच्छा नसल्यास ती शासकीय नोकरी स्वेच्छेने सोडायची असल्यास शासकीय नोकरी सोडण्याच्या कोणत्याही शासकीय कागदपत्रामध्ये -
 'मी माझ्या शासकीय सेवेचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करावा.' 
    अशी कोणतीही लेखी मागणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करू नये. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांतील 'राजीनामा' या शब्दाची व्याख्या व अर्थ यांचा सारासार विचार करता राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यास शासकीय नोकरीची आवश्यकता नाही असे कायदेशीर गृहीत धरले जाते. असा राजीनामा वरिष्ठांनी मंजूर केल्यास सदर राजीनामा देणारा कर्मचाऱ्यास किंवा अधिकाऱ्यास फक्त प्राॅव्हीडंट फंडाची रक्कम, शिल्लक तीनशे दिवसांचे वेतन व त्याचे खाती शिल्लक असणारी गटविमा रक्कम एवढेच शासकीय लाभ मिळतात. कुंटुब निर्वाह वेतन पेन्शन व अन्य लाभ मिळत नाहीत. 
      काही कारणास्तव जर एखाद्या शासकीय अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यास स्वेच्छेने नोकरी सोडायची असेल व त्याची सलग शासकीय सेवा वीस वर्षापेक्षा जास्त झालेली असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमातील नियम क्र 20 अन्वये आपल्या वरिष्ठांकडे नियोक्ती अधिकारी याचे कडे लेखी विनंती अर्जानुसार - 
    'मी ××××पद ××××× विभाग ××××× कार्यालय ××××× ता ×××× जि ××××× विनंतीपूर्वक नम्र निवेदन करतो की मी शासकीय सेवेत दि ××× रोजी दाखल झालो आहे. आजतागायत माझी सलग शासकीय सेवा वीस वर्षापेक्षा जास्तीची झालेली असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमातील शासकीय तरतुदीनुसार मी माझ्या शासकीय सेवेतून तीन महिने अगोदर आज दिनांक ××× रोजी स्वेच्छेने सेवानिवृत्ती माझ्या ××××××× या कारणास्तव घेऊ इच्छीतो. माझ्या स्वेच्छा सेवानिवृत्तीच्या तीन महीन्याच्या आगाऊ नोटीसची तीन महीने दिनांक ××××× रोजी मुदत पूर्ण होत असल्याने शासकीय सेवेतून दिनांक ××××× रोजी स्वेच्छा निवृत्तीची विनंती केल्यावरून शासकीय सेवेतून कार्यालयीन  वेळेनंतर सेवा निवृत्त करणेस नम्र विनंती करित आहे.'
     अशा प्रकारची लेखी नोटीस तीन महीने पूर्वी दिल्यास नोटीस कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यास स्वेच्छा सेवा निवृत्तीने शासकीय सेवेतून शासकीय नियमानुसार स्वेच्छा सेवानिवृत्ती घेता येते व अशी शासकीय स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यास स्वेच्छासेवा निवृत्ती नंतर फॅमीली पेन्शन, रजा रोखीकरण, पेन्शन विक्री, ग्रॅच्युईटी, गटविमा इत्यादी सर्व शासकीय लाभ त्या कर्मचारी अधिकाऱ्यास व त्याचे मृत्यू पश्चात त्याच्या विधवा पत्नीस तीचा मृत्यू होईपर्यंत मिळतात. 
   तरी सर्व कर्मचारी / अधिकारी यांना नम्र विनंती करतो की कोणत्याही कारणामुळे आपणास यापुढे शासकीय नोकरी करायची नसल्यास "राजीनामा" हा आपले सर्वतोपरी भविष्याचे न भरून येणारे नुकसान करणारा शब्द न वापरता "स्वेच्छा सेवा निवृत्ती" हा शब्द वापरूनच रितसर तीन महीन्याची नोटीस देऊन भविष्यात होणारे आपले अपरिमीत नुकसान टाळावे ही नम्र विनंती.
      कृपया सदरच्या नियुक्ती प्राधिकरण यांना सदरचा राजीनामा मंजूर करण्यापूर्वी परत घेऊन तीन महीन्याची स्वेच्छा सेवानिवृत्ती नोटीस देण्याबाबत विनंती करावी. कारण त्यांचे नियोक्ता अधिकारी यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केल्यास नंतर तो कायदेशीर रित्या पाठीमागे घेता येणार नाही व त्यांचे भविष्यकालीन खूप मोठे सर्वतोपरी नुकसान होईल. 

    असे वाटल्याने त्यांना ही प्रेमाची विनंती व जनजागृती करण्याचा खारीच्या वाट्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

🌹 धन्यवाद  🌹

⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com