⚜️फुलांची शिकवण⚜️

⚜️फुलांची शिकवण⚜️

  • गुलाब सांगतो - येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं.
  • रातराणी सांगते - अंधाराच्या डरायचं नसतं, काळोखातही फुलायचं असतं.
  • पारिजात सांगतो - पहाटेच्या थंडीत कुडकुडायचं नसतं, डोळे उघडत उठायचं असतं.
  • सदाफुली सांगते - रुसु रुसु रहायचं नसतं, सदा हसुनी हसवायचं असतं.
  • बकुळी सांगते - सावळ्या रंगानं हिरमुसायचं नसतं, गुणाच्या गंधानं जिंकायचं असतं.
  • मोगरा सांगतो - स्थलः च्या गुणांचा बडेजाव सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावरून येत असतो.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421