⚜️चांदोबा चांदोबा भागलास का⚜️

 ⚜️चांदोबा चांदोबा भागलास का⚜️

चांदोबा चांदोबा भागलास का
सोसायटीच्या बिल्डिंग मागे लपलास का
सोसायटी ची बिल्डिंग पाच मजली
मामाचा वाडा पाडून बांधली
मामाच्या फ्लैट मध्ये येवून जा
पाव-भाजी खावुन जा 
पावात सापडली माशी
चांदोबा राहिला उपाशी