⚜️उतारा वाचन भाग ८३⚜️
एक होता गणू. तो फार आळशी होता. शाळेत जायचा त्याला भारी कंटाळा. तो दात घासत नसे. अंघोळ करत नसे. त्यामूळे गणूला फारसे मित्रही नव्हते. नेहमी त्याच्या अंगात आळस भरलेला असल्याने त्याला काम करण्याचा नेहमी कंटाळा येई. आळसाने त्याचे आयुष्य निरस झाले होते.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) गणू कसा होता ?
२) गणूला कशाचा कंटाळा यायचा ?
३) गणू काय करत नसे ?
४) दात कोण घासत नसे ?
५) गणूला फारसे मित्र का नव्हते ?
६) गणूला काम करण्याचा का कंटाळा येई ? ७) गणूचे आयुष्य कशामूळे निरस झाले होते ?
८) अंघोळ कोण करत नसे ?
९) कोणाला फारसे मित्र नव्हते ?
१०) गणू ला कोणत्या सवयी होत्या ?
११) गणूच्या सवयी चांगल्या होत्या कि वाईट ते सांग.
१२) 'आळस' या शब्दावर आधारीत तुला माहित असलेला सुविचार सांग.
१३) उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?
१४) वरील उताऱ्याचे अनुलेखन कर.
१५) गणू ने कोणत्या सवयी बदलायला हव्यात असे तुला वाटते ?
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421