⚜️ उतारा वाचन भाग ८५⚜️
एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल..
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) उंदिर कोठे राहत होते ?
२) दुकान कशाचे होते ?
३) उंदिर किराणामालाच्या दुकानात का राहायचे?
४) किराणामालाच्या दुकानात कोण राहत होते ?
५) उंदिर कशावर ताव मारायचे ?
६) दुकानदाराचे नुकसान कोणामूळे होत होते ?
७) उंदिर कसे होते ?
८) खादाड कोण होते ?
९) दुकानदाराने काय विचार केला ?
(१०) दुकानदाला कंगाल होण्याची पाळी कोणामूळे येईल ?
११) वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग कर.
- ताव मारणे
- कंगाल होणे
१२) 'किराणामालाच्या' या शब्दात आलेल्या व्यक्तीचे नाव शोध.
१३) 'दुकानदार' या शब्दात शरीराचा कोणता अवयव आला आहे?
१४) 'विचार' या शब्दात कोणता अंक लपला आहे ?
१५) 'कंगाल' या शब्दात शरीराच्या कोणत्या अवयवाचे नाव आले आहे?
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421