⚜️नवा नवा छान⚜️
(चाल: गोरी गोरी पान, फुलासारखी छान)
नवा नवा छान, मी फ्रॉक घालणार
दादा, तुला मी राखी बांधणार।।धृ।।
थाट माट रांगोळीचा चंदनाचा पाट
ताट चांदीचे रे, नारळाचा भात
गोड गोड करंज्याही मीच वाढणार।।१।।
सुवर्णाच्या निरंजनात लाविते रे वात
ओवाळीन भाऊराया होई औक्षवंत
हात देई हाता दादा नाही सोडणार।।२।।
भरजरी किनारीखाली गुलाबाचे फुल
राखीवर शोभे दादा जरतारी झूल
तुझ्यासाठी दादा स्वारी आता हसणार।।३।।