⚜️उतारा वाचन भाग ७९⚜️
मोर हा आपल्या पृथ्वीवरील एक अतिशय सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे. मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी असण्याचा बहुमान आहे. मोर आपल्या रंगीबेरंगी पंख आणि भव्य नृत्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मोरांच्या डोक्यावर मुकुट असल्यामुळे त्याला पक्ष्यांचा राजा म्हणून देखील ओळखले जाते. मोर त्याच्या सुंदर पंखांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करतो. च्या नृत्याला मयूर नृत्य असे नाव देण्यात आले.
⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) या पृथ्वीवरील सुंदर पक्षी कोणता ?
२) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
३) मोर कशासाठी जगभर प्रसिध्द आहे ?
४) मोराला पक्ष्यांचा राजा का म्हणतात ?
५) मोर कधी नृत्य करतो ?
६) मोराच्या नृत्याला काय म्हणतात ?
७) मोर कसा नृत्य करतो ?
८) मयुर नृत्य कशास म्हणतात ?
९) पक्षांचा राजा कोण ?
१०) अतिशय सुंदर व आकर्षक पक्षी कोणता ?
११) 'मोर हा सुंदर पक्षी आहे' या वाक्यातील नाम ओळख ?
१२) उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिही.
१३) मोराला समानार्थी कोणता शब्द वरील उताऱ्यात आला आहे ?
१४) 'मोर' या शब्दावरुन आणखी वाक्य तयार कर.
१५) तुला आवडणाऱ्या पक्ष्यांची नावे लिही.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421