⚜️उतारा वाचन भाग ८६⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ८६⚜️

    एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू...हू... हू...हू...! कावळा काकडला. आता कुठे जाव बरं? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) काळे ढग कोठे जमा झाले ?
२) वारा कसा सुटला ?
३) टप टप काय पडू लागला ?
४) कावळ्याचे घर कशाचे होते ?
५) कावळ्याचे घर कशात वाहून गेले ?
६) थंडीने कोण काकडला ?
७) कावळ्याला काय आठवले ?
८) कावळा कोणाकडे आला ?
९) कोणाच्या घराचे दार बंद होते ?
१०) चिमणीकडे कोण आले ?
११) शेणाचे घर कोणाचे होते ?
१२) उताऱ्यात आलेल्या पक्ष्यांची नावे लिहा.
१३) 'कावळा काकडला' यात 'क' हे अक्षर किती वेळा आहे ?
१४) 'वारा' या शब्दाला तुला माहित असलेले समानार्थी शब्द लिही.
(१५) तुला माहित असलेली 'कावळा व चिमणीची गोष्ट' लिही.

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421