⚜️उतारा वाचन भाग ९९⚜️
अजगर भारतात सगळीकडे आढळतो. जंगलात किंवा ओलसर जागेत राहतो. वजन १०० ते १५० किलो असते. रंग भुरा असतो. शरीरावर गडद पट्टे असतात. अजगर भोजन दिसताच झडप घालतो.
⚜️उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१) अजगर कोठे आढळतो ?
२) अजगर कोठे राहतो ?
३) अजगराचे वजन किती किलो असते ?
४) अजगराचा रंग कसा असतो ?
५) अजगराच्या शरीरावर पट्टे कसे असतात ?
६) भोजन दिसताच अजगर काय करतो ?
७) अजगर... ..... सगळीकडे आढळतो.
८) अजगर.. ..... दिसताच झडप घालतो.
९) शंभर ते दिडशे किलो वजन कोणत्या प्राण्याचे असते ?
१०) 'जंगलात किंवा ओलसर जागेत राहतो.' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?
११) 'अजगराचा रंग भुरा असतो.' या वाक्यातील क्रियापद कोणते ?
१२) ओल - ओलसर अशाप्रकारचे 'सर' प्रत्यय जोडून येणारे शब्द लिही.
१३) 'अजगर' या शब्दपासून जास्तीत जास्त दोन अक्षरी शब्द तयार कर.
१४) 'झडप घालणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर.
१५) विविध प्रकारच्या सापांच्या चित्रांचा संग्रह करून एक चिकट वही तयार कर.
१६) 'अजगर भारतात सगळीकडे आढळतो.' या वाक्यातील नामे शोधा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421