⚜️उतारा वाचन भाग ९३⚜️
शाळा भरली होती. मुलांचा अभ्यास सुरू होता. बाहेर हलका हलका पाऊस पडत होता. बाई वर्गात शिकवत होत्या. मुले ऐकत होती. अचानक पावसाचा जोर वाढला. एक जोराची सर आली. वर्गाच्या छतावर पावसाचा आवाज यायला लागला. गार हवा सुटली. पण मुलांचे लक्ष मात्र अभ्यासात होते.
⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) कोणाचा अभ्यास सुरु होता ?
२) मुले कोठे अभ्यास करत होती ?
३) शाळा भरली होती का?
४) पाऊस, बाई,शाळा, एक, हलका हे शब्द वर्णानुक्रमे लाव.
५) पाऊस कसा पडत होता ?
६) वर्गात कोण शिकवत होते ?
७) बाई शिकवत असताना मुले काय करत होती ?
८) वर्गाच्या छतावर कशाचा आव 'यायला लागला ?
९) कशाचा जोर वाढला ?
१०) गार .......... सुटली.
१२) 'पाऊस' या शब्दात कोणते दोन अर्थपूर्ण शब्द लपले आहे ?
१३) 'एक जोराची सर आली.' या वाक्यात कोणता अंक आला आहे ?
१४) 'मूल' या शब्दाचा अनेकवचनी शब्द लिही.
१५) 'शाळेतील पाऊस' यावर आधारीत तुझा अनुभव लिही.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421