⚜️मेहनतीचे फळ⚜️
एक गाव होते त्या गावांमध्ये एक शेतकरी माणूस राहत होता त्या माणसाला चार मुले होती परंतु त्याचे चारही मुले अगदी अळशी होती. एक जणी ही काम धंदा करत नव्हते शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांचे आयुष्य सुखात चालले होते.
पण एक दिवस काय झाले शेतकऱ्याची तब्येत अचानक खराब झाली व त्याला कळाले आता आपण मरण पावणार परंतु आपण मरण पावल्याने आपल्या मुलांचे काय होणार? असा विचार तो करीत होता.एके दिवशी शेतकऱ्याची तब्येत अधिकच खराब झाली तेव्हा त्यांनी आपल्या चारही मुलाला जवळ बोलावले आणि सांगितले,” मुलांनो तुमच्यातील एकही जण काही काम करत नाही मी निघालो होतो तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मी आपल्या शेतामध्ये एकदा गेलेली भरलेला हंडा पुरला आहे जो कोणी हा फंडा खोडून काढत त्याला ते सर्व धन मिळेल.”असे सांगून शेतकऱ्याने आपला शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर शेतकऱ्याचे चारही मुले आपल्या शेतामध्ये जाऊन संपूर्ण शेत खोदून काढले परंतु त्यांना दागिन्यांनी भरलेला हंडा कुठेही मिळाला नाही. तेव्हा शेतकऱ्याचे चारही मुले खूप उदास झाली. ते दिवस होते पावसाळ्याचे.आता खोदलेल्या शेताचे काय करायचे म्हणूनच शेतकऱ्यांच्या एका मुलाने शेतीमध्ये दाणे टाकले. पाऊस पडल्याने काही दिवसातच ते जाणे बघून आले व बघता बघता शेतामध्ये मौल्यवान असे धान्य डुलु लागले.देवा शेतकराच्या मुलांच्या लक्षात आले की, बाबांनी सांगितलेलला तो मौल्यवान दागिन्यांनी भरलेला हंडा म्हणजेच आपली शेती आहे.”अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांची चूक लक्षात आले व सर्व मुले मिळून शेती करू लागले व आनंदाने जगु लागली.
तात्पर्य :- मेहनतीचे फळ नक्कीच एकदा एक दिवशी मिळत असते.