⚜️चमचा⚜️
चमचा शक्यतो स्टेनलेस स्टीलचा, काही वेळेस प्लास्टिकचा, लाकडाचा आणि क्वचित चांदीचा असतो. चमच्याच्या आकारानुसार आणि आकारमानानुसार चमच्याला आईसक्रीमचा चमचा, तुपाचा चमचा, चहाचा चमचा, टेबल स्पून किंवा डेझर्ट स्पून ही नावे मिळतात. हात स्वच्छ धुतलेले नसल्यास चमच्याने खाणे आरोग्यदायी असते.
- शिरा, पोहे, फोडणीचा भात यांसाखे घन अन्नपदार्थ खाण्यासाठी, पानात तूप, मीठ, चटणी वाढण्यासाठी किंवा मसाल्याच्या डब्यातील मसाले, शिजवायच्या वा शिजत असलेल्या पाकक्रियेत टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लहानमोठ्या लांबीचा दांडा असलेल्या साधनास चमचा असे म्हणतात. भात वाढायच्या मोठ्या आकारमानाच्या चमच्याला भातवाढणी म्हणतात. चमचा जर अर्धगोलाकार असेल तर त्याला डाव म्हणतात.
- सोन्याचा चमचा :- अतिश्रीमंत घरात जन्मलेल्या व्यक्तीबाबत " तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे " असे म्हणायची रीत आहे
- चमचेगिरी करणाऱ्या (लाळघोटेपणा/मखलाशी/चहाड्या/पुढेपुढे करणाऱ्या) व्यक्तीसदेखील लाक्षणिक अर्थाने 'चमचा' म्हणतात.
- काटेरी चमचा :- उपहारगृहात डोसा, उत्तप्पा यांसारखे पदार्थ खाण्यासाठी साध्या चमच्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचा जो चमचा दिला जातो त्यास काटेरी चमचा किंवा नुसताच काटा असे म्हणतात.
- लाकडी चमचा :- पूर्वीच्या काळी आईसक्रीम खाण्यासाठी लहान आकाराच्या चपट्या लाकडी चमच्याचा वापर केला जात असे. कालांतराने याची जागा प्लास्टिक चमच्याने घेतली. (महाराष्ट्रात प्लॅस्टिक चमच्याच्या वापराला बंदी आहे.)
============================
चापलुसी करणारे चमचे !
लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.
गुरुवार दिनांक 20/ 5/ 2021
सायंकाळ विशेष.
म.मराठी वृत्तसेवा मुंबई.
घरोघरी मातीच्या,मातीच्या चुली अशी म्हण फार पूर्वीपासून रूढ आहे. घरोघरी, दारोदारी, या सरकारी दप्तरी, राजशिष्टाचार मंत्र्यांच्या दारी, साहेबांच्या बंगल्यावर, असे चापलुसी करणारे चमचे गेल्या अनादिकाळापासून खुप आढळून येतात.
फार पूर्वी, राज दरबारामध्ये स्तुति पटन करणारे स्तुती सुमनं उधळणारे, असे काही चमचे खास निष्क्रिय राजे लोकांना समाधान वाटावे, यासाठी ठेवले जात असत, पाळले जात असे.
गावगाड्याच्या चौका वरती गावच्या सरपंचाचे व पाटलाचे कान भरण्यासाठी त्याकाळात आणि आज देखील चमचे असत.
गावगाड्यांच्या पंचायत पासून ते तालुक्याच्या फौजदाराचा डाव्या डोळ्या पर्यंत, कलेक्टरच्या बंगल्यापासून ते, आयुक्ताच्या केबिन पर्यंत, मंत्र्याच्या बंगल्या पासून ते, मंत्रालयातल्या सरकारी बाबू पर्यंत, असे पाळलेले,पोसलेले चमचे आपल्याला आढळून येतात.
केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी आपल्या एका भाषणात असे निवेदन करतात, की मंत्र्यांचे "पीए" म्हणजे चहापेक्षा किटली गरम आहे!
त्यामुळे अशी चमचेगिरी करणारे, अनेक प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला करणे हेच आता सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व्यावसायिकांच्या, हिताचे आहे. अशा चमचेगिरी करणाऱ्या अवलादी आपल्या घराशेजारी,आपले मित्र म्हणून देखील सुद्धा वावरत असतात, गाव वाड्यापासून ते तालुक्याच्या ठिकाण पर्यंत, सरकारी कलेक्टर कचेरीच्या दप्तरा पर्यंत, मंत्र्यांच्या सामान्य जनतेच्या दरबारात असे चमचे नेहमी फिरत असतात.
अशाच चमच्यामुळे अनेक वेळा गावातल्या ग्रामपंचायतच्या सत्तेचे, जहाज अनेक वेळा बुडलेले आहे. तसेच, अनेक आमदारांना मंत्र्यांना घरी बसावे लागले आहे. कारण अशा चमच्यांनी दिलेल्या अर्धवट माहितीच्या आधारे, चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करणाऱ्या लोकांना समाजकारण राजकारणात डावलले जाते. तसेच अशा, चमचा यांचे मुळे सत्तेची गोड फळे चाखणार या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अनेक गोष्टींचा उगम होतो. पण, त्यावेळी फार उशीर झालेला असतो.
अशा चमच्यांच्या जीवावरती समाजकारण, राजकारण करणाऱ्या अनेकांनी स्वतःच्या पायावरती दगडे आणि धोंडे मारून घेतले आहेत.
असेच चमचे ओळखायची साधी आणि सोपी पद्धत असते, अशा चमच्यांना एखाद्या माणसाच्या विरोधात जर तुम्ही तोंडावर बोलला तर ते त्याची रेघ आणि रेग सांगत बसतात. पण चमचाची क्रॉस फिरकी घेतली जाते हे त्यांना कधीही समजून येत नाही.
असेच चमचे आपल्या अवतीभवती, शेजारीपाजारी, मित्र म्हणून वावरत असतात. तालुक्याच्या पोलीस स्टेशनात नवीन येणाऱ्या सहाय्यक फौजदाराचा दोन चमचे असतात. एक वर्दीतला, चमचा असतो तर दुसरा बिगर वर्दीतला चमचा असतो. वर्दीतला चमच्या आपल्या या मताशी, सहमती असणाऱ्या इतर पोलिसांच्या विषयी तो साहेबांच्या कानात काहीतरी चांगलं खुसखुशीत सांगत असतो, तर आपल्या मर्जी विरोधात वागणाऱ्या अनेक पोलिसांना तो हार्ड,ड्युटी लावण्याविषयी, नवीन आलेल्या साहेबा जवळ चमचेगिरी करत असतो. तर बिगर वर्दीतला, तो चमचा तालुक्यातील कलेक्शन संदर्भात फौजदाराजवळ रुबाब मारत असतो. असे चमचे गावगाड्याच्या सरपंचापासून, ते तलाठ्याच्या हाताखालच्या, कोतवाला पर्यंत चमचेगिरी करत असतात. जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीत आण जिल्हापरिषदेच्या वर्तुळात असे अनेक चमचे नेहमी फिरत असतात.
लोकशाहीत अशा चमचा यांचा बंदोबस्त करता येत नसला तरी, कानाने आती हलक्या असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, व लोकप्रतिनिधी, यांचा मात्र बंदोबस्त करता येणे सहज शक्य आहे.
लोकशाहीमध्ये मी, सर्वांना समान व कोणतेही जात, धर्म, पंथ, रूढी, गरीब-श्रीमंत,असा भेदभाव न करता मी, मला दिलेली जबाबदारी पार पाडेल अशी शपथ घेणारे...... आपले कान आती हलके का करतात? ही गोष्ट नेमकी समजून येत नाही. एखाद्या माणसाविषयी जर न्याय देता येत नसेल तर राहूदे, मात्र त्याच्या वरती अन्याय करण्याचा अधिकार यांना कोणी दिला आहे, आणि ते अशा चापलूसी करणाऱ्याचे ऐकून घेतात, हे आता कुठेतरी थांबले पाहिजे.
फार पूर्वी राजधर्माच्या, सेवेकरिता ठेवलेले असे चमचे लोक, त्या राजाने न केलेल्या शिकारी विषयी, खूपसं भरभरून या शिकारीचे गोंडस कौतुक केले जाते. मात्र वस्तुस्थिती ह्यापेक्षा उलटी असते, याउलट या राजाकडून त्याच्या शेजारी असणाऱ्या बागेमध्ये हे पाळीव प्राण्याला आणून त्याची हत्या करून घेतली जाते, व त्याला शिकार असे गोंडस नाव दिले जाते.
जैसी राजा वैशी प्रजा, अगदी तसाच काळ आता या चमच्यांच्यामुळे आलेला आहे. मंत्री महोदयांना, आमदारांना तालुक्यातील नाराजी विषयी न सांगता, त्याने पूर्ण न केलेल्या विकास कामाविषयी न सांगता, जनता तूप भात खात आहे, अशी बतावणी मारून अशा अनेक चमच्यांनी अनेक आमदार खासदार,मंत्री महोदयांना घरी बसवलेले आहे. मात्र तरी देखील आशा चमच्यांना जवळ करणारे पुढारी, सरकारी दरबारातील सरकारी बाबू, यांना असेच चमचे नेहमी हवे असतात, ते त्यांच्या हितासाठी!
मात्र,अनेक सर्वसामान्य मध्यमवर्गीय, युवक व उद्योजकांचे यामध्ये होणारे करोडची नुकसान, अशा चमच्यांच्यामुळे बेदखल केले जाते, त्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते ते कायमचे.
चमचे आणि सल्लागार या खूप मोठा फरक आहे. चमचा याचे स्वतःचे मत कधीही नसते. तो इतरांच्या सांगण्यावरून आपले मत तयार करून विरोधाभास निर्माण करत असतो. असे चमचे वेडसर व एकतर्फी असतात. मात्र, अगदी या उलट, सल्लागार हा नेहमी ज्ञानी माणूस असतो, तो होणाऱ्या नफ्यापेक्षा,भविष्य काळात होणाऱ्या नुकसानीस संदर्भात ती टाळता येईल कशी यासंदर्भात उपाययोजना सुचवत असतो.
चमचेगिरी वा चचापलुसी करण्यापेक्षा तो,येणाऱ्या काळातील धोके व त्यावरती त्वरित करण्याच्या उपाययोजना, करून घेण्यासंदर्भात त्याच्या परिभाषेत तो दम भरत असतो. बदलत्या काळाची पावले ओळखणारा हा सल्लागार नेहमी, जनतेच्या हिताची, व त्यांच्या,जीवन मरणाची काळजी घेणारा ठरतो.
असे अनेक सल्लागार गाव गाड्या पासून तालुक्यापासून ते जिल्हास्तरापर्यंत पंच म्हणून ओळखले जातात, जे नेहमी, नाण्याच्या दोन्ही बाजूचा विचार करून आपले मत प्रदर्शित करत असतात.
निवडणुका आल्या की अशा चमच्यांना सुगीचे दिवस येतात.
निवडणुकीपूर्वी बिडी पिणाऱ्या सेवानिवृत्त शाळा मास्तर, निवडणुकीच्या प्रचारामध्ये, सिगारेटची पाकिटे दिवसाला पिताना आशा अनेक कार्यकर्त्यांची, वर्णी ही चमचे म्हणून या पुढारी मंडळींनी लावलेले असते.
सार्वजनिक जीवनामध्ये कानाने हलके असणारा लोकप्रतिनिधी तथा पुढारी, सरकारी बाबू तथा तालुक्याचा फौजदार, आशा चमचा यांचा आधार घेऊन जर आपले काम करत असेल तर येणारा काळ त्याला कधीही माफ करणार नाही. कारण चमचे हे अल्पसंतुष्ट असतात.
अल्पसंतुष्ट यांचे मार्गदर्शन घेणाऱ्या प्रवृत्तींचा इतिहास पुसला जातो. तो कधीही लिहिला जात नाही!
======================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421