⚜️उतारा वाचन भाग ९८⚜️

⚜️उतारा वाचन भाग ९८⚜️

     सापाचे नाव ऐकताच आपण घाबरतो. साप आपला शत्रू असे आपण समजतो, परंतु हे खरे नाही. साप आपला मित्र आहे. साप शेतातील उंदीर खातात म्हणून, शेतकऱ्याचा तो मित्र आहे. सापाच्या विषापासून औषधे तयार करतात.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) कोणाचे नाव ऐकताच आपण घाबरतो ?
२) आपण कोणाला आपला शत्रू समजतो ?
३) साप आपला शत्रू आहे हे खरे आहे का?
४) साप आपला मित्र आहे हे खरे आहे का?
५) शेतातील उंदीर कोण खातात ? 
६) साप शेतातील काय खातात ?
७) शेतकऱ्याचा मित्र कोण ?
८) सापाचे विषापासून काय तयार करतात ?
९) कोणाच्या विषापासून औषधे तयार करतात ? 
१०) तुम्हाला माहित असलेले सापाचे वेगवेगळे प्रकार लिही.
११) 'शेतकऱ्याचा तो मित्र आहे.' तो हा शब्द कोणत्या शब्दाऐवजी वापरला आहे ?
१२) 'मित्र' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द लिहा. 
१३) 'मित्र' या शब्दाचा समानअर्थी शब्द लिहा.
१४) आपण नागाची पूजा कोणत्या सणाला करतो ?
१५) सापाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ?

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421