⚜️उतारा वाचन भाग ९५⚜️
उन्हाळ्याच्या सुट्टीत राजू मामाच्या गावाला गेला होता. गावाचे नाव राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. राजूच्या मामाच्या गावात आठवड्याचा बाजार भरतो. एकदा मामा राजूला आठवड्याच्या बाजारात घेऊन गेला. बाजारात माणसांची चांगलीच गर्दी दिसत होती.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) राजू मामाच्या गावाला कधी गेला होता?
२) राजूच्या मामाचे गाव कोणते होते ?
३) राजूर गाव कोणत्या तालुक्यात आहे ?
४) आठवडा बाजार कोठे भरतो ?
५) राजूला आठवडे बाजारात कोण घेऊन गेले ?
६) एकदा मामा राजूला कोठे घेऊन गेला ?
७) माणसांची गर्दी कोठे दिसत होती ?
८) बाजारात चांगलीच काय दिसत होती ?
९) उन्हाळ्याच्या सुट्टीत राजू कोठे गेला होता ?
१०) राजूर गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
११) उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिही.
१२) 'मामा' कोणाला म्हणतात ?
१३) 'अहमदनगर' या शब्दापासून जास्तीत जास्त शब्द तयार कर.
१४) 'राजू मामाच्या गावाला गेला होता' या वाक्यातील नाम व क्रियापद शोध.
१५) तुमच्या गावाचा 'आठवडी बाजाराचे' दहा ओळीत वर्णन कर.