⚜️उतारा वाचन भाग ८७⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ८७⚜️

   एका शेतात एक शेतकरी अंबाडीचे बी पेरत होता. कुंपणावर बसलेल्या पक्ष्यांतला एक शहाणा पक्षी म्हणाला, “हा अंबाडीची पेरणी करत आहे, याच्यापासून सावध राहा.आत्ताच सर्वांनी मिळून ते सर्व बी गिळून टाका, नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.” पण त्याच्या या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) शेतकरी शेतात कशाचे बी पेरत होता ?
२) कुंपणावर बसलेला शहाणा पक्षी काय म्हणाला ?
३) शहाण्या पक्ष्यांने इतर पक्ष्यांना कोणापासून सावध राहण्यास सांगितले ?
४) कोणाला सर्व बी गिळून घेण्यास सांगितले ?
५) पक्ष्यांना कशाचे बी गिळण्यास सांगितले ? 
६) इतर पक्ष्यांनी शहाण्या पक्ष्यांच्या बोलण्याकडे लक्ष का दिले नाही ?
७) इतर पक्ष्यांना कोण सावध करत होता ?
८) शेतकरी अंबाडीचे बी कोठे पेरत होता ?
९) शेतात शेतकरी कशाची पेरणी करत होता ?
१०) पक्ष्यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल असे शहाण्या पक्ष्याला का बरे वाटत असेल ? 
११) 'अंबाडी' सारखे तुला माहित असलेले अनुस्वारयुक्त शब्द लिही.
१२) 'एका शेतात एक शेतकरी अंबाडीचे बी पेरत होता' या वाक्यात 'शेत' शब्द किती वेळा आला आहे ?
१३) 'सर्व' या सारखे आणखी शब्द लिही. 
१४) तुला माहित असलेल्या भाज्यांची नावे सांग.
१५) वरील उतारा मोठ्याने वाच व लिही.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421