⚜️उतारा वाचन भाग १००⚜️
किशोरला पेढे फार आवडतात. तो घरच्या पायरीवर बसून पेढा खात होता. सातारहून आणलेला कंदी पेढा ! वाटीत दुसरा पेढा होता. काहीतरी विचार करून तो पटकन उठला. कुदळीने पायरीपाशी खड्डा खोदला. वाटीतला पेढा अलगद खड्ड्यात पेरला.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) कोणाला पेढे फार आवडतात ?
२) किशोर पेढे कोठे बसून खात होता ?
३) किशोरला काय आवडते ?
४) सातारहून काय आणले होते ?
५) वाटित किती पेढे होते ?
६) किशोर काय विचार करून चटकन उठला ?
७) किशोरने खड्डा कोठे खोदला ?
८) किशोरने पायरीपाशी खड्डा कशाने खोदला ?
९) वाटीतला पेढा किशोरने कोठे टाकला ?
१०) घरच्या पायरीवर बसून पेढे कोण खात होते ?
११) कंदी पेढा कोठून आणला होता ?
१२) 'पटकन' यासारखे आणखी शब्द लिही.
१३) 'तो पटकन उठला.' या वाक्यातील सर्वनाम लिही.
१४) ‘अलगद' या शब्दाला पर्यायवाची शब्द लिही.
१५) पेढ्यांचे तुला माहित असलेले प्रकार लिही.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421