⚜️उतारा वाचन भाग ९२⚜️

⚜️उतारा वाचन भाग ९२⚜️

    भीम हा सर्वात बलशाली पांडव. त्याला आपल्या बाहू बलाचा गर्व झाला होता. एकदा काय झालं, खांदयावर गदा टाकून तो ऐटीत चालला होता. वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला. त्याची लांब शेपूट वाटेवर आडवी पसरली होती.

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) सर्वात बलशाली पांडव कोण होता?
२) बाहूबलाचा गर्व कोणाला झाला होता ?
३) भीमाला कशाचा गर्व झाला होता?
४) खांदयावर गदा टाकून ऐटीत कोण चालले होते'
५) भीमाला वाटेत कोण दिसले ? 
६) कोणाचे शेपूट वाटेवर आडवे पसरले होते?
७) वाटेत म्हातारा वानर कोणाला दिसला
८) खांदयावर काय टाकून भीम ऐटीत चालला होता ?
९) वानराचा कोणता अवयव वाटेवर आडवा पसरला होता ?
१०) 'भीम हा सर्वात बलशाली पांडव होता.' या वाक्यातील नाम ओळख. 
११) 'तो ऐटीत चालला होता.' या वाक्यातील सर्वनाम कोणते ?
१२) 'त्याला एक म्हातारा वानर दिसला.' या वाक्यातील अंकदर्शक शब्द कोणता ?
१३) "वानर" या शब्दाला समानार्थी शब्द लिही.
१४) 'खांदयावर गदा टाकून तो ऐटीत चालला होता.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?
१५) पाच पांडवांची नावे लिहा.


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421