⚜️विसरू नको रे आई बापाला⚜️
विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया
काया झिजउन तुझा शिरावर पडली सुखाची छाया
रे वेडया मिळनार नाही तुला आईबापाची माया
तुझ मिळेल बायको पोर गणगोत्र मित्र परिवार
स्वार्था ने गुरमटलेला हा मायेचा बाजार
जीवना मधली अमोल संधि नको घालवू वाया
रे वेडया मिळनार नाही तुला आईबापाची माया
आई बाप जिवंत अस्ता तू नाहीं केलि सेवा
अन मेल्यावर्ती कश्याला मनतोस देवा देवा
बूंदी लाडूच्या पंगती बसवती नंतर तू जेवाया
रे वेडया मिळनार नाही तुला आईबापाची माया
स्वामी ह्या तिन्ही जगाचा आई बिना भिकारी
समजुन उमजुन वेडया तू होऊ नको अविचारी
सोपनाचे बोल ध्यानी घे अज्ञान हे वर काया
रे वेडया मिळनार नाही तुला आईबापाची माया
वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
⚜️संकलन⚜️