⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - अवयवांशी संबंधित वाक्प्रचार⚜️

⚜️विद्याधन भाषिक उपक्रम -  अवयवांशी संबंधित वाक्प्रचार⚜️   

⚜️उत्तरसूची⚜️   
  1. नाक मुरडणे - नापसंती व्यक्त करणे.
  2. नाक खुपसणे - नको तिथे दखल देणे.
  3. नाक उडवणे - तोरा मिरवणे.
  4. नाकी नऊ येणे - हैराण होणे, दमणे.
  5. नाक दाबणे - बोलायला प्रवृत्त करणे.
  6. डोके घालणे - लक्ष देणे.
  7. डोके चालवणे - बुद्धी चालवणे.
  8. डोक्यावर घेणे - स्तुती करणे, गौरव करणे.
  9. डोक्यात येणे - लक्षात येणे.
  10. डोके फिरणे - चक्रावणे, राग येणे.
  11. कानांवर येणे - सहज ऐकू येणे.
  12. कान फुंकणे - एखादयाविषयी संशय निर्माण करणे.
  13. कान टवकारणे - सावधपणे ऐकणे.
  14. कान पिळणे - अद्दल घडवणे.
  15. कान उपटणे - समज देणे.
  16. डोळे निवणे - समाधान पावणे.
  17. डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे.
  18. डोळे वटारणे - रागावणे.
  19. डोळ्यांवर येणे - लक्षात येणे.
  20. डोळे मिटणे - मरण पावणे.