⚜️हेंचि दान देगा देवा⚜️
हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥धृ॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥१॥
तुझा विसर न व्हावा.....
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥२॥
तुझा विसर न व्हावा.....
तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥३॥
तुझा विसर न व्हावा.....
वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.