⚜️विद्याधन उपक्रम(भूगोल) - दिशा ⚜️
⚜️उत्तरसूची⚜️
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सांगा.
1) मुख्य दिशा किती आहेत ?
उत्तर :- चार
2) उपदिशा किती आहेत ?
उत्तर :- चार
3) मुख्य दिशांची नावे सांगा ?
उत्तर :- पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
4) उपदिशांची नावे सांगा ?
उत्तर :- ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य.
5) पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर :- ईशान्य
6) पूर्व आणि दक्षिण यांमधील दिशा कोणती ?
उत्तर :- आग्नेय
7) दक्षिण आणि पश्चिम यांमधील दिशा कोणती ?
उत्तर :- नैऋत्य
8) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर :- वायव्य
9) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती?
उत्तर :- पूर्व
10) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
उत्तर :- पश्चिम
11) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्य उजव्या हाताकडे कोणती दिशा असते?
उत्तर :- दक्षिण
12) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या हाताकडे कोणती दिशा असते?
उत्तर :- उत्तर
13) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते?
उत्तर :- पश्चिम
14) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर :- उत्तर