⚜️मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान⚜️

⚜️मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान⚜️

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान

बालपणी होते माझे मन हे अजाण
तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान
गेले सर्व ध्यान
वृद्धपण येता आली जागती महान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

पतितांना पावन करते दया तुझी थोर,
भीक मागतो मी चरणी, अपराधी घो...र,
अपराधी घो...र
क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण
मिळे ज्याने मुक्ती ऐसे  द्यावे मज ज्ञान

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान


वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.