⚜️सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत⚜️

⚜️सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत⚜️  

या पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत.... || धृ ||

राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर 
लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर
टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती ... || १ ||

राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या
धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या
पायी जोडविला मोती नवलाख साजत.... || २ ||

नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला 
चढता उतरताना गवंडीदादा हरपला
सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ..... || ३ ||

वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.