⚜️नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ⚜️

⚜️नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ⚜️

चला मंगळ वेढे पाहू ...(2)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)....||धृ.||

वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती...
ती कथा मुखाने गाऊ...(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)...||||

भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी...
आदराने सुमने वाहू...(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ....(३)...||||

कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी...
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ...(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ...(३)...||||

वरील गीत ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.