⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - अवयवांवरून म्हणी ⚜️
⚜️ उत्तरसूची⚜️
⚜️रिकाम्या जागी शरीराचा योग्य अवयव भरा व म्हणी पूर्ण करा.
- बुडत्याचा पाय खोलात.
- हाताच्या काकणाला आरसा कशाला ?
- उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग
- अंथरून पाहून पाय पसरावे
- नाकापेक्षा मोती जड.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी
- आपला हात जगन्नाथ
- आपलेच दात, आपलेच ओठ.
- गाढवाच्या पाठीवर गोणी
- उठता लाथ बसता बुकी
- एका हाताने टाळी वाजत नसते.
- नावे ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
- हाताची पाचही बोटे सारखी नसतात.
- कानामागून आली नि तिखट झाली.
- खायचे दात वेगळे,दाखवायचे दात वेगळे.
- मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये.
- सुसरबाई तुझी पाठ मऊ.
- काखेत कळसा नि गावाला वळसा.
- गोगलगाय आणि पोटात पाय
- आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
- उचलली जीभ लावली टाळ्याला.
- आधी पोटोबा मग विठोबा
- अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज
- खोट्याच्या कपाळी गोटा
- डोळ्यात केर आणि कानात फुंकर
- तोंड दाबून बुक्यांचा मार
- गोरागोमटा कपाळ करंटा