⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - समानार्थी शब्द शोध ⚜️
⚜️उत्तरसूची⚜️
⚜️ पुढील वाक्यातील लपलेली समानार्थी शब्द जोडी शोधून लिहा.
- लता, झाडावरील वेल बघ. - लता, वेल
- सुमन, ते छान फूल बघ.- सुमन, फूल
- पंकज पाण्यातील कमळ बघ. - पंकज, कमळ
- मकरंद गोड मध खातो. - मकरंद, मध
- सलील थंड पाणी अंगावर घेतो. - सलील, पाणी
- भूषण कपाटात दागिना जपून ठेवतो. - भूषण, दागिना
- शीतल गार वारा सुटला. - शीतल, गार
- सारस बागेतील तलाव पहा. - सारस, तलाव
- आकाश आभाळ बघ. - आकाश, आभाळ
- विपिन घनदाट जंगल बघणार आहे. - विपिन, जंगल
- संग्राम चित्रपटातील लढाई बघतो. - संग्राम, लढाई
- शशी आकाशातील चंद्र बघतो. - शशी, चंद्र
- मिलिंद रोज सकाळी सकाळी भुंगा बघतो. - मिलिंद, भुंगा
- ज्योत्स्ना आकाशातील चांदणे बघते. - ज्योत्स्ना, चांदणे
- कांचन म्हणाली, सोने पिवळे आहे. - कांचन, सोने
- विनायक आज गणपती दर्शनासाठी गेला. - विनायक, गणपती
- मयूर बागेतील सुंदर मोर बघतो. - मयूर, मोर
- सरिता पाण्याने दुथडी भरून वाहणारी नदी बघते. - सरिता, नदी
- राघू झाडावर बसलेला पोपट बघतो. - राघू, पोपट
- रवी रोज सकाळी सूर्य दर्शन घेतो. - रवी, सूर्य
- भूमी आणि धरती जीवलग मैत्रिणी आहेत. - भूमी, धरती
- वनराज म्हणजे जंगलचा राजा सिंह असतो.- वनराज, सिंह
- सारंग सुंदर हरिण बघतो. - सारंग, हरिण
- सौदामिनी, मध्यरात्री खूप उशिरा वीज आली. - सौदामिनी, वीज
- सकाळी घरी तनया नावाची मुलगी आली. - तनया, मुलगी
- सोबत माया आणि ममता आली. - माया, ममता
- निशा, खूप रात्र झाली आहे.- निशा, रात्र
- उषा, ऊठ आता. पहाट झाली. - उषा, पहाट
- नरेश आणि राजा जीवलग मित्र आहेत. - नरेश, राजा
- पवन, दरवाजा बंद कर. जोराचा वारा आला आहे. - पवन, वारा
- वर्षा, छत्री उघड. पाऊस आला. - वर्षा, पाऊस
- प्रकाश, अरे, किती उजेड आला! - प्रकाश, उजेड
- मनोहर हा सुंदर मुलगा आहे. - मनोहर, सुंदर
- प्रवीण हा हुशार मुलगा आहे. - प्रवीण, हुशार