⚜️विद्याधन उपक्रम- आपल्या परिसरातील लोक ⚜️

⚜️विद्याधन उपक्रम- आपल्या परिसरातील लोक⚜️

 ⚜️उत्तरसूची⚜️

⚜️ आपल्या परिसरातील निरनिराळे उद्योग / काम करणारे लोक कोणते ?
  1. लाकडी सामान तयार करणारा - सुतार
  2. लोखंडी हत्यारे तयार करणारा - लोहार
  3. मडकी, माठ, आणि विटा तयार करणारा - कुंभार
  4.  करंडे, टोपल्या, सुपे विणणारा - बुरूड
  5.  केरसुण्या तयार करणारा - बुरूड
  6.  चपला - बूट तयार करणारा - चांभार
  7.  कपडे धुवून, इस्त्री करून देणारा - परीट
  8. कपडे शिवून देणारा - शिंपी
  9. दागिने तयार करणारा - सोनार
  10. शेतीची मशागत करणारा - शेतकरी 
  11. किराणा माल विकणारा - किराणा दुकानदार
  12. भाजीपाला विकणारा - भाजीवाला 
  13. मिठाई तयार करणारा - हलवाई
  14. बांधकाम करणारा - गवंडी 
  15. टपाल  वाटणारा - पोस्टमन
  16. रोग्यांना तपासून औषध देणारा - डाॅक्टर 
  17. बांगड्या भरणारा - कासार
  18. भांड्यांना कल्हई करून देणारा - कल्हईवाला 
  19. दारोदार खेळणी/खाऊ विकणारा - फेरीवाला
  20. मजुरीने काम करणारा - मजूर 
  21. नाव वल्हविणारा - नावाडी
  22. दूध विकणारा - गवळी
  23. कुस्ती खेळणारा - पहिलवान
  24. शाळेत  मुला‌- मुलींना शिकविणारा - शिक्षक
  25. फुलांच्या माळा, गजरे विकणारा - फुलमाळी
  26. दररोज गावातील रस्ते झाडणारा - झाडूवाला
  27. देशाचे रक्षण करणारा - सैनिक
  28. रोग्यांची सेवा करणारी - नर्स  / परिचारिक
  29. गुरे चारावयास नेणारा - गुराखी
  30. बस , गाडी  चालविणारा - ड्रायव्हर
  31. बसमध्ये तिकिटे देणारा - कण्डक्टर
  32. रिक्षा चालविणारा - रिक्षावाला
  33. टांगा हाकणारा - टांगेवाला
  34. घोड्यावर बसणारा - घोडेस्वार
  35. बैलगाडी चालविणारा - गाडीवान 
  36. हत्तीला चालविणारा - माहूत
  37. विजेची कामे करणारा - वायरमन
  38. नळाचे फिटिंग करणारा - प्लंबर / जुळारी
  39. नाटकात काम करणारा - नट