⚜️Masked Aadhar Card⚜️
⚜️Aadhar Card New Rules ⚜️
⚜️ आधार कार्डची झेरॉक्स देताय? सरकारने दिला सावधानतेचा इशारा, वाचा सविस्तर.
⚜️ 🇮🇳 अति महत्वाचे 🇮🇳⚜️
- Aadhar Card :- विविध योजनांसाठी, कामांसाठी आधार कार्ड देखील अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स जमा करून घेतली जाते. तुम्ही देखील आधार कार्डची झेरॉक्स जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड बाबत महत्त्वाचे आदेश काढले आहेत. या नव्या सुचनेनुसार आधार कार्डची झेरॉक्स कुठेही जमा न करण्यास सरकारने म्हटले आहे. आधार कार्डचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने हे आदेश काढले आहेत. एखाद्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स अत्यावश्यक असल्यास आधारकार्डचा असलेली झेरॉक्स द्यावी, अशी सूचना सरकारने केली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. नागरिकांना आवाहन करताना केंद्र सरकारने म्हटले की, तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी एखाद्या व्यक्तीला अथवा संस्थेला देऊ नये. ज्या संस्थांनी UIDAI कडून परवाना घेतला आहे, त्याच संस्था आस्थापनाने एखाद्या व्यक्तिची माहिती घेण्यासाठी आधार कार्डचा वापर करू शकतात. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, हॉटेल, सिनेमागृह अथवा इतर खासगी संस्थांना ग्राहकांकडून, व्यक्तींकडून आधार कार्डची प्रत जमा करून घेण्याचा अधिकार नाही.
- Masked Aadhar चा वापर करा :- केंद्र सरकारने आधार कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी Masked Aadhar Card चा वापर करण्याचे आवाहन केले आहे. "Masked Aadhar Card" मध्ये आधार क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक दिसतात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा वापर करून होणारी शक्यता बरीच कमी होते.
- Masked Aadhar Card डाउनलोड कसा करावा?:- Masked Aadhar Card मध्ये तुमचा 12 अंकी क्रमांक दिसणार नाही. त्याऐवजी फक्त शेवटचे 4 अंक दिसतील. "Masked Aadhar Card" हा UIDAI च्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येऊ शकते.
- https://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवर जा. > तुमचा आधार क्रमांक नमूद करा. तुम्हाला Masked Aadhar Card हवाय का हा पर्याय दिसेल, तो निवडावा. > डाउनलोडचा पर्याय निवडावा आणि आधार क्रमांकातील शेवटचे चार आकड्यांसह आधार कार्डची प्रत मिळवता येईल.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421
======================================