⚜️ज्वारीचे तीन पोते⚜️

 ⚜️ज्वारीचे तीन पोते⚜️

      ही तीन भावाची  कथा आहे. तिघेही भाऊ प्रेमाने राहायचे. तिघेही चतुर ,हुशार व इमानदार होते. मोठा  भाऊ किराणा दुकान मध्ये काम करायचा. सगळ्यात छोटा भावाने आता फक्त शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि तिसरा भाऊ पुजारी होता. त्यांच्या बाबाचा मृत्यू झाला होता . एक दिवस त्यांच्या बाबाचे मित्र त्यांच्या घरी आले. ते त्या तिघांचाही आईला म्हणाले, “माझ्या मुलीचे लग्नाचे वय झाले आहे. मला एक छान मुलगा हवा जो माझ्या  मुलीला चांगले ठेवण व माझ्या कामाला मदत चांगली करेन.मला तुमचे तिन्ही मुलं चांगले वाटते. म्हणून मी तुमच्या तिनही  मुलाची परीक्षा घेणार आहे.” त्यांनी पूर्णपणे परीक्षा चा विचार करून निर्णय  घेतला. नंतर च्या दिवशी, त्यांनी सगळ्यांना एक एक ज्वारी चे पोते दिले. आणी म्हणाले, “मी काही  कामासाठी बाहेरगावी  चाललो. मी दोन-तीन महिन्यांनी येणार. आणि मी बघणार तुम्ही या त्याचे काय केले. नंतर दोन-तीन महिने झाले तरीपण मित्र वापस नाही आला. कमीत कमी एक दीड वर्ष गेले. मग ते परत आले. ते सगळ्यात पहिले पहिल्या भावाजवळ गेले. पहिला  भाऊ म्हणाला , “या मी तुमचे स्वागत करत आहे. तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचे पोते दिले होते मी त्या पोत्याला माझ्या दुकान मध्ये विकून टाकले. हे घ्या त्याचे पैसे”. त्याच्यानंतर मित्र दुसऱ्या भावाजवळ गेले. तो म्हणाला “, मी एक पुजारी आहे. माझ्या मंदिरामध्ये खूप सारे गरीब आले होते मी त्यांना ती ज्वारी त्यांच्यात वाटली . आणि मला हे खात्री आहे की त्याचा आशीर्वाद तुम्हालाच भेटेन.” मित्र सगळ्यात शेवटी तिसऱ्या भाऊ कडे गेले. तो भाऊ म्हणाला “, तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचं पोत दिलं होतं. माझ्या शेजारच्या येथे शेत आहे. मी त्याच्या घरी गेलो. त्याला विनंती केली की मी तुमचं अर्ध शेत वाहू  शकतो का? तो म्हणाला, “हो”. मि त्या अर्ध्या शेतात एका पोत्याच्या ज्वारीचे 25 पोते बनवले. त्याच्यातले 25 पैकी 5 पोते मी त्यांना विकले.” “हे घ्या पैसे आणि ही 20 पोते”.
   आता तुम्हाला तर माहीतच असेल की मित्राने आपला कोणता  जावई निवडला असेन? अर्थातच  तिसरा भाऊ.

तात्पर्य:- मेहनतीचे फळ कधी पण गोडच असते.विचार करून केलेल्या कार्याचे सुयोग्य सुयश नक्कीच  दडलेले असते.