⚜️किंम्मत⚜️

  ⚜️किंम्मत⚜️ 

    एका राज महालात एक बाई मोलकरीण म्हणुन काम करत असते. तिचा लहान मुलगा ही तिथच तिच्या बरोबर येत असे. एक दिवस त्याला राजमहालात खेळता खेळता हीरा सापडतो , तो मुलगा तो हीरा घेऊन पळत आई कडे जातो. आई बघ मला हीरा सापडला , मोलकरीण हुशार असते , तीला वाटते हा हीरा घेऊन आपण बाहेर नाही जाऊ शकणार , ती मुलाला म्हणते नाही रे काच आहे तो हीरा नाही . असे म्हणुन हीरा बाहेर फेकुन देते .
      काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हीरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हीरा सोनारा कडे घेऊन जाते. सोनाराला कळत कि हिला हा हीरा सापडला असणार कुठेतरी. हिला काय माहीत हा हीराच आहे अस म्हणुन; तो तीला म्हणतो हा हीरा नाही ही तर काच आहे. असे म्हणुन तो पण तो हीरा बाहेर फेकुन देतो.
      जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हीरा घेऊन येतो व जोहरी कडे घेऊन जातो. जोहरी हीरा पाहतो त्याला कळत हा हीरा अनमोल आहे त्याची नियत खराब होते. तो हीरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो काच आहे अस म्हणतो. जसा हीरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळ एक वाटसरु लांबुन पाहत असतो. तो त्या ही-या जवळ येतो आणि त्याला म्हणतो मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकल तेव्हा तु तुटला नाही, पण आता का तुटला तु , हीरा म्हणतो जेव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले ते माझी खरी किंमत जाणत नव्हते. परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता, तरी त्याने मला फेकले हा आघात मी सहन करुच शकलो नाही. म्हणुन मी तुटलो. असेच मनुष्याच्या बाबतीत होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमच मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.

 तात्पर्य : - कधीही आपल्या लोकांचे जराश्या स्वार्था करता मन तोडु नका... आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणस हि-यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका.