⚜️आपलेपण⚜️

 ⚜️आपलेपण⚜️     

     एक गरुड़ पक्षी एका उंच कड्यावर बसून ससा टेहळित असता एका तिरंदाज पारध्याने त्यास पाहिले. आणि अचूक नेम धरून तीर सोडला.                 
   तो तीर त्या गरुडाच्या मर्मस्थानी लागून तो अगदी मरनोन्मुख झाला. मरता मरता उरात शिरलेल्या तिराकडे त्याची नजर गेली आणि तो पाहतो तर त्या तिराच्या पिसा-यास त्याचीच पिसे लावलेली त्याच्या दृष्टिस पडली.
       तेव्हा  तो म्हणाला..."माझ्या पंखातील पिसांनी त्याचा पिसारा सज्ज केला आहे." अशा रीतीने मी मरावे याबद्दल मला वाईट वाटले.
तात्पर्य :- आपल्यावर आलेले संकट आपल्याच लोकांच्या मदतीने उत्पन झालेले पाहून त्याबद्दलचे दुःख दुणावते.