⚜️कृतज्ञता⚜️

 ⚜️कृतज्ञता⚜️


       मेंढ्यांच  रक्षण करताना लांडग्यांशी लढणारा मेंढपाळाचा हा शूर कुत्रा स्वतःच्याच रक्तानं मखलाय .. पण त्याचसोबतची मेंढी त्याने केलेल्या  लढ्याला आणि शूर योध्याला  धीर देताना  पाहायला मिळतेय.
      आपण स्वतः कितीही निर्भय, ताकदवान अथवा कठोर  असू पण एखाद्याला त्याने घेतलेल्या प्रयत्नांबद्दल किती प्रशंसा करतो अथवा  त्याचा  निस्वार्थ सेवेला किती  दाद  देतो हे खूप महत्वाचा आहे. ज्याने  तुमचं  नातं आयुष्याच्या  शेवटच्या क्षणापर्यंत टिकून  राहत.
       मेंढ्यांच  रक्षण  करणं  हे आपलं कर्तव्य  समजून जीव  देण्यासही  तयार  होतो पण त्याचसोबत मेंढीद्वारे मिळणारं  हे आपुलकीच वागणं त्याला एक मानसिक समाधान  देऊन  जात.
    जो तुमच्या पाठीमागे  सतत  उभा  राहतो अश्या लोकांना आयुष्यात गृहीत  धरू नका. तुम्हाला  गरज  असेल  तेंव्हा स्वतः च कर्तव्य  समजून  हि लोक  तुमच्या पाठीमागं  उभी  असतात. त्यांच्या  प्रत्येक प्रयत्नाला दाद द्यायला  विसरू नका. मानसिक  आधार द्यायला  विसरू  नका. वरून कठोर आणि आतून प्रेमळ  असणाऱ्या या मंडळींना तुमच्या आपुलकीची दोन शब्द  लढण्याचं  नवं बळ  देत असतात. त्यांना दाखवून  द्या कि तुम्ही त्यांच्या पाठबळाप्रती कृतज्ञ  आहात.

 तात्पर्य:-   रक्षण  करणारा  श्वान बनता नाही आला तरी आभार मानणारी मेंढी बनायला  विसरू नका ..!