⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - सांगा सांगा सांगू ?⚜️
साहित्य :- आवश्यक नाही
श्रेणी:- मौखिक भाषा विकास
कृती :- वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार वर्तुळात उभे करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत वर्तुळात उभे रहावे. विद्यार्थ्यांची उभे राहताना अशी रचना करावी की, पुढील विद्यार्थी डावा हात मागील विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या तळव्यावर असेल शिक्षकाने " सांगा सांगा" असे म्हणावे व त्या वेळेस विद्यार्थांना "काय सांगू?" असे म्हणण्यास सांगावे. शिक्षकाने पुढील विद्यार्थ्याच्या हातावर टाळी देऊन प्राणी, पक्षी, फळे, फुले किंवा गावांची नावे यांपैकी एक उदा. प्राण्याची नावे त्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना एका प्राण्याचे नाव सांगण्यांस सांगावे व पुढील विद्यार्थ्याना टाळी देण्यास सांगावी, अशा प्रकारे दुसऱ्या वेळी पक्षी, फळे, फुले या प्रकारे घ्यावे.
उपयोग :- विद्यार्थ्याला समुहात बोलण्याची सवय लागेल तसेच प्राणी, पक्षी, फळे, फुले यांची नावे माहीत होतील.