⚜️अटॅच तर होतोच आपण डिटॅच होता आलं पाहिजे...⚜️

   ⚜️अटॅच तर होतोच आपण डिटॅच होता आलं पाहिजे...⚜️

वार्धक्याच्या पाऊलखुणा चाल करताहेत अंगावर
कधी गुडघे पाय तर कधी दुखते आहे कंबर
ठाव सोडणाऱ्या दातांना हसून बाय म्हणलं पाहिजे
अटॅच तर होतो आपण डिटॅच होता आलं पाहिजे...

लेक व्हावी  जावयाची मुलगा सुनेचा झाला पाहिजे 
आत्तापर्यंत आपलेच होते आता एकमेकांचे झाले पाहिजे
नातवंडे ही त्यांची संपत्ती एवढी समज यायला पाहिजे 
अटॅच तर होतो आपण डिटॅच होता आलं पाहिजे...

ऑफिसच्या खुर्चीशीही किती अटॅच होतो आपण
पैसा पद प्रतिष्ठेचेही गुलाम होतो आपण
टायर्ङ होण्याआधी रिटायर होता आलं पाहिजे
अटॅच  तर होतोच आपण डिटॅच होता आलं पाहिजे...

ज्याने दिली चोच तो देईल चारा पाणी
भरवणारे कोण आपण तो  आहे दुसरा कोणी
शरीर नश्वर, आत्म्याशीतादात्म्य होता आलं पाहिजे...
अटॅच तर होतोच आपण डिटॅच होता आलं पाहिजे...