⚜️तुम्ही फक्त .........⚜️

 ⚜️तुम्ही फक्त .........⚜️

खूप सोप्प्या आहेत हो काही गोष्टी
तुम्ही उगाचच त्या करायला घेता .....

तुम्ही एकही झाड लावू नका
ते आपोआप उगवतात
तुम्ही फक्त ती तोडू नका !

तुम्ही कुठल्याही नदीला स्वच्छ करू नका
ती प्रवाही आहे , स्वतः स्वच्छच असते
तुम्ही फक्त तिच्यात घाण करू नका !

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका
सर्व शांतच आहे
तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका !

तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही 
तुम्ही फक्त त्याना मारू नका,  जंगले जाळू नका!

तुम्ही माणसाचे व्यवस्थापन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नका
सर्व व्यवस्थितच आहे
फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित रहा !

_✒️  वसुधैव कुटुंबकम्

⚜️संकलन⚜️ 

श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421