⚜️दर्शन शिखराचे⚜️

⚜️दर्शन शिखराचे⚜️

   मंदिरामध्ये मूर्तीचे दर्शन न मिळाल्यास शिखराचे दर्शन का घ्यावे?

 
देवतांचे दर्शन घेण्याचे एकूण तीन पध्दती आहेत.

१-मुख दर्शन
२-धर्म दर्शन
३-शिखर,कळस दर्शन

   जर भक्तांना देवतेचे दर्शन घेणे शक्य नसेल तर भक्त गण कळसाचे दर्शन घेतात. कारण कळसाचे दर्शन हे भारतीय ऊर्जेचे स्तोत्रे मानले जातात. आकाशातील ऊर्जा मूर्तीत काळसातून प्रवाहित होते. मंदिरात जाण्यामागे पंचतत्वांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे हा हेतू आहे. आणि दुसरे एक कारण म्हणजे संत तुकारामांना पंढरीच्या वारीत विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसला
आणि त्यांना कळसावर विठ्ठलाचे दर्शन झाले विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर ते धावत पंढरी कडे जाऊ लागले.

    आज ही भक्त पंढरीला ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजाणा कळसाचे दर्शन होत होते त्या ठिकाण पासून धावत पंढरीला जातात. आणि आज हि त्या ठिकाणाहून दर्शन होत आहे हे स्थान पंढरपूरहुन १ कि.मी अंतरावर आहे वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला किती हि लांबून गेले तरी गर्दी मुळे दर्शन मिळणं शक्य न झाल्यास कळसाचे दर्शन करतात कारण प्रत्येक मंदिराच्या कळसा मध्ये सुक्षमरूपात ती मंदिरातील देवता विराजमान असते. म्हणून कळसाचे दर्शन करतात. कळसाचे दर्शन केल्यास देवतांचे दर्शन केल्याचे फळ प्राप्त होते.

मुख दर्शन:- हे दुय्यम प्रकारचे दर्शन आहे. या दर्शनात फक्त देवतेच्या मुखाचे दर्शन घेऊन समाधान मानतात.

धर्म दर्शन:- हे दर्शन सर्वात श्रेष्ठ दर्शन आहे. या दर्शनात देवतेच्या संपूर्ण रूपाचे दर्शन होते. भक्तांच्या रज आणि तम गुणांचा नाश या दर्शनात होतो. कळस, शिखर दर्शन:- हे दर्शन धर्मदर्शन आणि मुखदर्शनातला पर्याय आहे येथे देवतेचे प्रत्येक्ष दर्शन होत नाही पण दर्शनाचे फळ पुण्य प्राप्त होते.

🚩 !! श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!🚩
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏


⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.

पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421