⚜️कांदेनवमी⚜️
कांदेनवमी ! एक विलक्षण खाद्ययोग !!
पूर्वी आषाढी एकादशीच्या आधीच्या दिवसात, घरात कांही तेल-तुपाचे पण पचायला हलके पदार्थ मुद्दाम तयार केले जात असत. त्याला आषाढ तळणे असे म्हणत असत. पावसाळ्यात अनेक रोगांच्या साथी उद्भवतात. हा मरीआई देवीचा कोप मानला जात असे आणि असा कोप होऊ नये म्हणून या देवीची पूजाअर्चा करून तिला नैवेद्य अर्पण केला जात असे.
पण आषाढ शुद्ध नवमी ही कांदेनवमी म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात असे. या नंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी आणि तेव्हाच सुरु होणारा चातुर्मास हा एक मोठा धार्मिक-सामाजिक कालखंड असे. चार महिने कांदा, लसूण, वांगे असे वातूळ आणि पचायला जड असलेले पदार्थ खाणे वर्ज्य केले जात असे. म्हणून या नवमीच्या दिवशी घरात असलेले सर्व कांदे हे संपविले जात असत, अर्थातच कांदाभजी ( आणि कांद्याचे अनेक पदार्थ ) करून !
यासोबतच बटाटा, वांगी, मिर्ची, ओव्याची पाने, मायाळूची पाने यांचीही भाजी केली जात असत. घरातील सर्व मंडळी यात सामील होत असत. गावाकडे तुफान पडणारा पाऊस आणि गरमगरम भजी, हा एक विलक्षण खाद्ययोगच म्हणायचा !
कांदाभजी आणि पाऊस यांचे काय नाते आहे काही माहिती नाही. पण आता पावसाचं ....