⚜️वारी पंढरीची ...⚜️
करुया वारी विठुराया आणि त्याच्या पंढरी बद्दल प्रश्नोत्तरे रुपात
उत्तरसुची
- पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर
- पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
- विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)
- विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा
- त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा
- शास्त्र पुराणातील विठ्ठलाचे नाव = बौद्ध/बोधराज
- महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त संप्रदाय = वारकरी
- कर्नाटलातील विठ्ठलभक्त संप्रदाय = हरिदास
- विठ्ठलमंदिर कोणत्या नदीकाठी वसले आहे = भीमा
- भीमा नदीला या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखतात = चंद्रभागा
- विठ्ठलाला कशाचा हार घातला जातो = तुळशी व मंजिरी
- तुळस हे कोणाचे प्रतिक मानले जाते = श्री लक्ष्मी
- मुख्य मंदिराची निर्मिती कोणत्या शतकात झाली असावी = १२ वे शतक
- मुख्य मंदिराची निर्मिती कोणी केली/ कोणाच्या कालखंडात झाली असावी = देवगिरीचे यादव प्रशासक
- विठ्ठलाचे पंचाक्षरी नाव = पंढरीनाथ
- पंढरपूर चे मूळ कानडी नाव = पंडरगे
- त्यावरून विठ्ठलाला हे नाव पडले = पांडुरंग
- पांडुरंग या शब्दाचा अर्थ काय/म्हणजे कोणता रंग = शुभ्र रंग
- विठ्ठलाच्या गळ्यातील हार कसला बनविलेला आहे = कौस्तुभमणी
- विठ्ठलाला विटेवर उभे करणारा भक्त कोण = भक्त पुंडलिक
- विठ्ठल किती काळ विटेवर उभा आहे = २८ युगे
- संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाची कोणती 2 विशेषणे वापरली आहेत = कानडा व कर्नाटकु
- श्री विष्णूच्या 24 अवतारात किंवा सहस्त्रनामात उल्लेख नसल्यामुळे संत मंडळी त्याला कोणत्या 2 शब्दांनी संबोधतात = चोविसावेगळा व सहस्त्रांआगळा
- वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव = विठ्ठलसंप्रदाय
- वर्षभरातील 2 प्रमुख वाऱ्या कोणत्या = आषाढी व कार्तिकी एकादशी
विठ्लाचे नामस्मरण करा।आनंदी व सुखात रहावे आपल्या घरा।।
🙏🏻🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🏻