⚜️बटुकेश्वर दत्त⚜️
एक भारतीय क्रातिकारी
दिव्यत्वाची जेथ प्रचीती। तेथे कर माझे जुळती ।।
●जन्म :~ १८ नोव्हेंबर १९१०
●मृत्यू :~ २० जुलै १९६५
◆ बटुकेश्वर दत्त ◆
एक भारतीय क्रातिकारी होते. बटुकेश्वर दत्त यांचा बंगाल मधील ओरी गावात झाला होता. यांचे वडील गोष्ठ बिहारी हे कानपूर मध्ये नौकरी करत असल्याने ते कानपूर मध्ये राहत असत. नंतर कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे.तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.
या सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
पुढे अंदमान च्या कारागृहात १९३३ व १९३७ साली उपोषण करून त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठावाला,परंतु १९३८ साली महात्मा गांधींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले. अंदमानच्या कारागृहात क्षयरोगाने जर्जर झालेले असताना देखील बाहेर येताच त्यांनी आपले क्रांतिकार्य पुनःश्च सुरु केले अन १९४२ साली त्यांनी असहकार्य चळवळीत त्यांनी उडी घेताच त्यांना ४ वर्षांकरिता पुन्हा कारागृहात डांबले गेले. नंतर स्वातंत्र्याच्या अगदी थोडे आधी १९४५ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.
त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली. पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली आपले प्राण त्यागले.
पंजाबात हुसैनीवाला या ठिकाणी भगतसिंह, राजगुरू अन सुखदेव बटुकेश्वर दत्त यांची स्मृतीस्थाने आहेत.