⚜️चहा पिण्याची पद्धत व स्वभाव!⚜️

⚜️चहा पिण्याची पद्धत व स्वभाव!⚜️

   चहा पिण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते. त्याचे निरीक्षण केल्यास स्वभावाचा बर्‍यापैकी अंदाज घेता येतो. आपणही निरीक्षण करा आणि अंदाज बांधा...
  • ☕चहा घ्यायचा का चला चहा घेऊ, स्वतःहून अशी ऑफर देणारे सर्वसमावेशक स्वभावाचे असतात. यांचा फारसा कुणाशी वाद नसतो...
  • ☕चहाला प्रथमदर्शनी नाही म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात..
  • ☕मोठा भुरका मारून चहा पिणारे फारशी कोणाची तमा बाळगत नाहीत. जे योग्य वाटेल ते करून मोकळे होतात..
  • ☕गरम चहा पटकन पिऊन टाकणारे सतत गंभीर विचार करत असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेचे टेन्शन घेतात.
  • ☕चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेऊन पिणारे महत्त्वाच्या ठिकाणी उशिरा पोहोचतात.
  • ☕चहाचा ग्लास अथवा कप हाताने पूर्ण कव्हर करून पिणारे केअरिंग असतात. आजारी व्यक्तीची जरा अधिक चौकशी करतात.
  • चहा गार अथवा गरम याचा फारसा विचार न करता पिणारे व्यवहार कुशल असतात..
  • ☕विशिष्ट प्रकारच्या चहाची ऑर्डर देणारे फारसे कुणात मिसळत नाहीत..
  • ☕विशिष्ट ठिकाणीच चहा घेणारे पटकन गैरसमज करून घेऊ शकतात...
  • ☕चहा पिता पिता एखादा विनोदी किस्सा सांगणारे थोडेसे बेफिकीर असतात..
  • 🥛☕ग्लास अथवा कप विशिष्ट पद्धतीने धरूनच चहा पिणारे एखाद्या विषयात तज्ञ असतात...
  • ☕ सर्वांसाठी चहा सांगतात, पण स्वतः घेत नाहीत, असे चांगले सल्लागार असतात. क्षणात परिस्थिती ओळखतात..
  • ☕🍵 नियमित प्रकारातला चहा न घेता विशिष्ट पद्धतीचा चहा घेणारे अबोल अनप्रेडिक्टेबल असतात..
  • ☕चहा शिवाय ज्यांची बॅटरी चार्ज होत नाही, अशी मंडळी महत्वाच्या निर्णयांची बऱ्याच ठिकाणी खात्री करूनच ठरवतात.
  • ☕बसूनच शांतपणे चहाचा आस्वाद घेणारे कमी लाभाची परंतु खात्रीशीर गुंतवणूक करतात...
  • ☕🍵बशीतून चहा घेणारे कोणत्याही बाबतीत लवकर कन्व्हिन्स होत नाहीत...
  • ☕चहा घ्यायचा म्हणून घेणारे गाव मित्र असतात..
  • ☕चहा गार करून पिणारे कलाकार असतात. बोलताना अचूक शब्दच वापरण्याकडे कल असतो.
  • ☕चहाची वेळ अजिबात न चुकवणारे, प्रसंगी एकटा चहा पिणारे सहजपणे शब्दात अडकू शकतात..
  • 🍵अधून-मधून चहा घेणारे नर्मविनोदी असतात..
  • ☕ चहा संपेपर्यंत अजिबात न बोलणारे चिडखोर असू शकतात...
  • चहासोबत बिस्किट खारी अथवा पाव खाणारे कोणत्याही परिस्थितीत मध्यम मार्ग स्वीकारतात...
  •   कोणत्याही प्रकारचा चहा बिलकुल वर्ज्य असणारे लोक स्वतःच करून घेतलेल्या एका विशिष्ट चौकटीत राहत असतात..
चला तर मग येतायं ना चहा   घ्यायला...!!!

⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
babanauti16.blogspot.com  
📞9421334421