⚜️ पार्टी नकोय मित्रा तुझी ⚜️
पार्टी नकोय मित्रा तुझी, येवून फक्त भेटत जा ....
काय चाललंय मनात तुझ्या, भेटून फक्त बोलत जा.
मोकळं सोड स्वतःला जरा, कधीतरी मोकळं होत जा ....
हलकं वाटेल तुझंच तुला, मन रिकामं करत जा .
जुन्या आठवणी गप्पागोष्टी, आमच्यात सुद्धा रमत जा ....
आलेच कधी वाईट विचार, बिनधास्त फोन करत जा.
काय आहे आयुष्य अजून, निदान मनातले वाटत जा ....
पहा किती फरक पडतो, आनंद तेव्हढा लुटत जा.
पन्नाशी पार केली आपण, संपर्कात तेव्हडं रहात जा....
काय हवं काय नको तुला, कुणाला तरी सांगत जा.
मित्र असतात कशासाठी, मैत्री तेव्हढीच जपत जा
आम्ही फक्त मस्त जगतो, तसाच मस्त जगत जा.
पैसा नाही लागत त्याला, मनातले मात्र सांगत जा
पार्टी नकोय मित्रा तुझी, येवून फक्त भेटत जा..
🌹🌹मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421