⚜️विद्याधन मराठी कोडी.... ओळखा पाहू मी कोण ?⚜️

 ⚜️विद्याधन मराठी कोडी.... ओळखा पाहू मी कोण ?⚜️

उत्तर सूची

१] पांढरं पातेल पिवळा भात ?
उत्तर: -  अंड

२] तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला ?
उत्तर: - लवंग

३] पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब ?
उत्तर: - झाडू/केरसुणी

४] काळ्या रानात हत्ती मेला त्याचा पृष्ठभाग ऊपसून नेला ?
उत्तर: - कापूस

५] काट्याकुट्यांचा बांधला भारा, कुठं जातोस ढबुण्या पोरा ?
उत्तर: - फणस

६] कुट कुट काडी पोटात नाडी, राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी ?
उत्तर: - घंटा/टाळ

७] हजार येती हजार जाती हजार बसती पारावर, अशी नार ती जोराची हजार घेती ऊरावर ?
उत्तर: - लोकलट्रेन

८] एवढीशी नन्नुबाय, सार्‍या वाटनं गीत गाय ?
उत्तर: - शिटी

९] कोकणातनं आली नार, तिचा पदर हिरवागार, तिच्या काखेला पोर ?
उत्तर: - काजू

१०] कोकणातनं आली सखी, तिच्या मानंवर दिली बुक्की, तिच्या घरभर लेकी ?
उत्तर: - लसूण

११] कोकणातनं आला भट, धर की आपट ?
उत्तर: - नारळ

१२] कांड्यावर कांडी सात कांडी, वर समुद्राची अंडी ?
उत्तर: - ज्वारीचे कणीस

१३] कोकणातनं आला रंगू कोळी, त्यानं आणली भिंगू चोळी, शिंपीण म्हणते शिवू कशी, परटीण म्हणते धुवू कशी, अन् राणी म्हणते घालू कशी ?
 उत्तर: - कागद

१४] सोन्याची सुरी भुईत पुरी, वर पटकार गमजा करी ?
उत्तर: - गाजर

१५] थई थकड धा..  तीन डोकी पाय धा.?
उत्तर: - दोन बैल,नांगर आणि माणूस

१६] खण खण कुदळी, मण मण माती, इंग्रजांनी राज्य घेतले मध्यराती.
उत्तर: - घूस

१७] एव्हढिशी नार, तिचा पदर फार.
उत्तर: - खारुताई

१८] चार आले पाहुणे, चार केले घावणे, प्रत्येकाच्या तोंडात दोन दोन
उत्तर: - खाट

१९] लाल पालखी हिरवा दांडा.
उत्तर: - मिरची

२०] कोकणातनं आला भट धर की आपट
उत्तर: - नारळ

२१] घमघम घमाटा, विषाचा काटा, सोन्याच्या देवळात रुप्याच्या घंटा
उत्तर: - फणस

२२] घाटावरनं आल्या बाया, त्यांच्या सुरकुतल्या काया.
उत्तर: - खारीक

२३] लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही.
उत्तर: - लालकृष्ण अडवाणी

२४) एका बाटलीत दोन रंग, फुटली की सगळेच दंग.
उत्तर: - अंड