⚜️संकटावर मात⚜️
एका कुंभाराचे गाढव एकदा एका भल्या मोठ्या खड्ड्यात पडते. बाहेर येण्यासाठी ते धडपडत असतं. त्याच्या ओरडण्याकडे कुंभाराचे लक्ष जाते. पण म्हतारे झालेल्या कुचकामी गाढवाला वाचवून काय उपयोग? त्याला फुकट खाऊ घालण्यापेक्षा त्याच्यावर माती टाकून त्याला इथेच गाडून टाकू असा स्वार्थी विचार करुन एक एक पाटी कुंभार गाढवाच्या अंगावर टाकू लागला. काही वेळाने गाढवाचे ओरडणे थांबले. तेव्हा कुंभार खड्ड्यात पाहू लागताच गाढव वर आलेले त्याला दिसले. कुंभार माती टाकत होता. तेव्हा गाढव पाठ हलवूनमाती खाली झटकत होते व त्यावर उभे रहात. जसा मातीचा ढिग होत गेला तसे गाढव वर आले.
तात्पर्य - अंगावर आलेल संकट असेच झटकून टाकले तर त्यावर सहज मात करता येते.