⚜️ २. स्वप्नं विकणारा माणूस⚜️
प्रश्न१:- पुढील प्रश्न वाचा. योग्य पर्यायास गोल करा.
१. मानसाला काय बघता आली पाहिजेत ?
अ) निसर्ग ब) स्वप्न क) गाव ड) चित्र
२. स्वप्न विकणारा माणूस कशावर बसून येत होता ?
अ) हत्तीवर ब) बैलावर क) घोड्यावर ड) गाढवावर
३. स्वप्न बघण्यासाठी मन कसे असावे लागते ?
अ) बळकट ब) संवेदनशील क) सुदृढ ड) परिपक्व
४. स्वप्न विकणाऱ्या मानसामुळे लोक काय विसरून जायेचे ?
अ) दुःख ब) आनंद क) भान ड) घर
५. स्वप्न विकणारा माणूस कोठे थांबायचा?
अ) गावात ब) मैदाणावर क) पिंपळाच्या पारावर ड) मंदिरात
६. स्वप्न विक्या माणूस गावोगावी का जाऊ शकत नव्हता?
अ) डोके दुखीमुळे ब) पोटदुखीमुळे क) गुडघेदुखीमुळे ड) अ व ब पर्याय
७. स्वप्नविक्याच्या मुलाचे शिक्षण काय झाले होते ?
अ) डी. एड् ब) बी. एड् क) वैद्यकीय ड) मॅट्रीक
८. स्वप्न विक्या गावात काय विकायचा ?
अ) स्वप्न ब) सुकामेवा क) केळी ड) पेरू
प्रश्न२:- तुमचे मत स्पष्ट करा.
- अ. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'स्वप्नविक्या' म्हणत.
- आ. स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.
प्रश्न३:- स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.
- अ. त्याचा पेहराव:-
- आ. त्याचे बोलण:-
- इ. त्याचे स्वप्नः-
प्रश्न४:- खालील मुद्दे स्पष्ट करा.
- अ. स्वप्नविषय लेखकाचे मतः-
- आ. स्वप्नाविषयी इतरांचे मतः-
- इ. स्वप्नं विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू:-
प्रश्न ५:- कल्पना करा व लिहा.
- स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे.
प्रश्न ६ :- अ. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.
- हार =१) ----------------- २) -------------------
- कर =१) ----------------- २) -------------------
- वात =१) ----------------- २) -------------------
आ. खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट 'ब' गट
१. मती कुंठित होणे. ( ) (अ) कंठ दाटून येणे.
२. तरतरी पेरण. ( ) (आ) विचारप्रक्रिया थांबणे.
३. गहिवरून येणे. ( ) (इ) उत्साह निर्माण करणे.
(इ) खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.
- (अ) कुतूहल = ---------------------------------------
- (आ) संभ्रम = ----------------------------------------
⚜️निर्मिती⚜️
श्री.बबन मोहन औटी.पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421