⚜️लाकूडतोड्या आणि देवदूत⚜️

⚜️लाकूडतोड्या आणि देवदूत⚜️

     एक गाव होते त्या गावांमध्ये एक लाकूडतोड्या राहत असे तो लाकूडतोड्या रोज नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून एक लाकूडतोड्या लाकडे तोडत असतो. एक दिवस काय झाले लाकूडतोड्या नदीकाठी एका झाडावर चढून लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडते. नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुऱ्हाड काढता येत नव्हती. तो दुःखी होऊन रडू लागतो. हे पाहून नदीतून एक देवदूत येतो. तो त्याला म्हणतो की, काळजी करू नकोस. मी तुला तुझी कुऱ्हाड काढून देतो. तो देवदूत नदीत डुबकी मारतो व सोन्याची कुऱ्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कु-हाड? लाकूडतोड्या म्हणतो, नाही ही माझी कुऱ्हाड नाही..
   देवदूत पुन्हा नदीत डुबकी मारतो व चांदीची कुऱ्हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुऱ्हाड? लाकुडतोड्या म्हणतो नाही. मग तो देवदुत लोखंडाची कुऱ्हाड काढतो. लाकूडतोड्या आता मात्र हीच माझी कुऱ्हाड असल्याचे सांगतो. 
  कुऱ्हाड परत मिळाल्याने आनंदी होतो. लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकूडतोड्यावर प्रसन्न होतो. त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून
देतो.
तात्पर्यः- नेहमी प्रामाणिक राहावे कारण प्रामाणिकपणाचे फळ नक्कीच एके दिवशी मिळते.