⚜️सात रत्न⚜️
- 💎 माफी :- तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने माफ करा.
- 💎 विसरा :- दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. निःस्वार्थ भावना ठेवा.
- 💎विश्वास :- नेहमी स्वकष्ट आणि निसर्गावर अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
- 💎नातं :- दुसऱ्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मना पेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं नात्याला जपा. नात्यांना तडा जावू देवू नका.
- 💎 दान:- नेहमी सढळ हाताने दान करा. दान केल्याने धन कमी होत नाही. उलट दान केल्याने मिळतो मान. आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.
- 💎 आरोग्य:- दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.
- 💎 वैराग्य:- नेहमी लक्षात ठेवा की, जन्म आणि मरण कधीच कुणालाच चुकलेले नाही. जन्म घेतला म्हणजे मृत्यु अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित बसू नका. जीवन खूप सुंदर आहे, आनंदाने जगा. माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे. बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, बंगला, गाडी, सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
babanauti16.blogspot.com
📞9421334421